जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 जुलै रोजी इपिलेप्सी शिबिराचे आयोजन

 


अलिबाग,दि.30 (जिमाका):- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा रुग्णालयात इपिलेप्सी शिबिराचे रविवार, दि.03 जुलै 2022 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात इपिलेप्सी रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार होण्यासाठी न्यूरॉलॉजिस्ट किंवा इपिलेप्सीलॉजिस्ट (अपस्मार चिकित्सक) यांच्याकडून निदान व औषध उपचार करण्याच्या दृष्टीने रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे.

या इपिलेप्सी शिबिराकरिता दि.03 जुलै 2022 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत जिल्हा प्रशिक्षण केंद्र,जिल्हा रुग्णालय,रायगड अलिबाग येथे सीएमई आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबईचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.निर्मल सूर्या हे मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरात औषधोपचार सल्ला मोफत देण्यात येणार असून औषधेही विनामूल्य पुरविले जाणार आहेत. या शिबिरात आकडी/फिट या रोगांसाठी आवश्यक लागणाऱ्या तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी होऊन उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक