अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी मंजूरीबाबत कार्यशाळेचे आयोजन

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- केंद्र शासनाने स्टॅन्डअप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2020-21 पासून योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारात स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15% सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येते.

या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी घेण्याकरिता दि.30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र, यशवंतनगर, शिळफाटा, खोपोली, ता.खालापूर येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

या कार्यशाळेसाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उद्योजकांनी उपस्थित राहावे, तसेच या योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कच्छी भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग-402201 येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक