नवरात्रोत्सवात ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपण व ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची परवानगी

 

अलिबाग,दि.30 (जिमाका):- रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात सन 2022 या वर्षाच्या कालावधीत ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2017 च्या नियम 5 उपनियम 3 नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यत जिल्ह्यात 15 दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत.

अधिसूचनेद्वारे नवरात्र उत्सवाच्या कालावधीत पंचमी, अष्टमी व नवमी असे एकूण तीन दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच दि.1 ऑक्टोबर 2022 या दिवशी नवरात्रोत्सवासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत निर्देश दिलेले आहेत.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास देण्यात आलेल्या सूटमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी त्यांना प्राप्त अधिकारातून पूर्वीच्या अधिसूचनेत अंशत: बदल करून नवरात्री उत्सव 3 दिवस (पंचमी, अष्टमी व नवमी) ऐवजी नवरात्री उत्सव (दि.1 ऑक्टोबर 2022, अष्टमी व नवमी) या दिवशी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2017 च्या नियम 5, उपनियम 3 नुसार  श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक