उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 

 

              अलिबाग,दि.28(जिमाका):- राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

               शनिवार, दि.29 जुलै 2023 रोजी रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. मध्यरात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव.

रविवार, दि.30 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वा. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी नियोजन समिती बैठकीनंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार रायगड जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या अँड्राईड मोबाईल ॲपचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी 1.00 वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी 1.30 वा. रायगड जिल्हा शबरी घरकुल योजना सन-2023-24 बैठक. स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी 2.00 वा. पत्रकार परिषद, स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, अलिबाग. दुपारी सोईनुसार अलिबाग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक