इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

 

 

अलिबाग,दि.23 (जिमाका):- खालापूर मधील इर्शाळगड येथील  दुर्घटनास्थळी आज  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच दरड दुर्घटनाग्रस्तांची पंचायत मंदिर येथे  सांत्वनपर भेट घेतली.

 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी सांगितले की, इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांना शेती रोजगार आणि घर देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. अशा दरड दुर्घटना कायम स्वरूपी टाळण्यासाठी डोंगर कपारीत राहणाऱ्या राहिवासीयांचा देशव्यापी सर्व्हे करून त्यांचे कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे. अशा दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन वन विभागाच्या जमीनीवर होऊ शकते. तसे संपूर्ण देशात डोंगरकपारीवर राहणाऱ्या लोकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी त्यांचे सुरक्षित स्थळी पुनर्सवन केले पाहिजे. त्यासाठी एखादी नवीन योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून कारण्यासाठी आपण प्रयत्न करु असे केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले.

 इर्शाळगड दुर्घटनाग्रस्तांना केंद्र सरकार तर्फे मदत मिळवून देऊ तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे  एकूण रु.5 लाख सांत्वनपर मदत मंत्री आठवले यांनी यावेळी जाहीर केली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त तहसिलदार पूनम कदम आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक