जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवसानिमित्त आदरांजली अर्पण


 

अलिबाग,दि.26(जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालय राजस्व' सभागृहामध्ये आज दि. २६ जुलै २०२३ कारगिल विजय दिवस लेफ्टनंट कर्नल वैजनाथ माने,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व शहिदअमर जवान प्रतिमेस फुले वाहून श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी स्तब्धता पाळून आदरांजली वाहीली.

 कार्यक्रमास शहीद जवान निलेश तुणतुणे यांची वीर माता, वीर पिता यांचा शाल श्रीफळ तसेच साडी देऊन सन्मान करण्यात आला.
 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे श्री गोविंदराव मारुती साळुंखे, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कारगिल युध्दा विषयी थोडक्यात माहिती सांगितली.

 ले. कर्नल राहुल बैजनाथ माने  यांनी कारगिल युध्द तसचे भारतीय सेनेविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमास सुबेदार नरेश रामचंद्र पवार आपल्या परिवारासह, विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व आजी सैनिक उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमामध्ये तरुण मुला/मुलीना सैन्यामध्ये भरती होणेबाबत मार्गदर्शन 
 केले. कार्यक्रमास शासकिय अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक