पीएम किसान योजनेंतर्गत 14 व्या हप्त्याचे गुरुवारी वितरण कृषि विज्ञान केंद्र रोहा व कर्जत, खार संशोधन केंद्र पनवेल येथे कार्यक्रम

 

 

अलिबाग,दि.26(जिमाका) :- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पी.एम.किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना आयोजित 14 व्या हप्त्याचा लाभ वितरीत करण्यासाठी राजस्थान मधील सिकर येथे भव्य संमेलन आयोजित केले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना अदा करावयाच्या 14 व्या हप्त्याचे वितरण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि.27 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता केले जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kissan ) देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यातील एप्रिल 2023 ते जुलै 2023 देय लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून ऑनलाईन समारंभामध्ये वितरीत होणार आहे.

या समारंभाचे थेट प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र रोहा, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र कर्जत, खार संशोधन केंद्र पनवेल, ग्रामपंचायत स्तरावरून तसेच तालुक्यातील गावोगावी कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले आहे.

तरी या लाभ वितरण समारंभामध्ये http://pmindiawebcastnicin  लिंकव्दारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी, व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक