01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त आरोग्य व रक्त तपासणी शिबिर संपन्न

 


 

रायगड(जिमाका)दि.01:-  प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग व   जिल्हा कारागृह अलिबाग  यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग कारागृहातील बंद्यांसाठी  कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई योगेश देसाई  व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली  01 डिसेंबर जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त (दि.29 डिसेंबर 2023) रोजी आरोग्य व रक्त तपासणी शिबिर संपन्न झाले.

यावेळी कारागृह अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र रणनवरे, तुरुंग अधिकारी किशोर वारगे, शशिकांत निकम व कर्मचारी तसेच लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष संजय रावले,  विभागीय अध्यक्ष श्रीम.प्रियदर्शिनी संजय पाटील  विद्याधर पैठणकर सदस्य  उपस्थित होते. 

        या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बंद्यांना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबा  संजय माने   यांनी एचआयव्ही/एड्स तसेच गुप्तरोग या आजाराबद्दल मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी एचआयव्ही/एड्स म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे, उपाय व घेण्यात येणारी काळजी याबाबत शास्त्रीय माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. मितेश पाटील यांनी बंद्यांची आरोग्य तपासणी केली.

        लायन्स क्लब श्रीबागच्या माजी अध्यक्षा ॲड.कला पाटील यांनी बंद्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरिता गाण्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या वेळी बंद्यांना आरोग्य विषयक शास्त्रीय माहिती देऊन एकूण 94 बंद्यांची आरोग्य व रक्त तपासणी करण्यात आली.     

              या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, आरबीएसके विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मितेश पाटील, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ  सौ. सुजाता तुळपुळे, समुपदेशक अर्चना जाधव, डीएसआरसी समुपदेशक सचिन जाधव,  मोबाईल आयसीटीसी व्हॅन प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, साथी या संस्थेचे  प्रिझम पिअर मोबिलाझर (PPM) सत्यनारायण इंगळे, एचएलएल लॅब च्या फ्लेबो श्रीम.जुईली पाटील हे उपस्थित होते.  

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वरिष्ठ तुरुंग अधिकारी  रामचंद्र रणनवरे यांनी करून त्यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व लायन्स क्लब श्रीबाग यांचे विशेष आभार मानले. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक