जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी नोंदणी करावी


 

रायगड(जिमाका)दि.02 :- जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024फ्रान्स (ल्योन) येथे होणार असून या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध 52 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयं वेबपोर्टलवर नोंदणी करावीअसे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त श्रीम. अ.मु.पवार  यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024फ्रान्स (ल्योन) येथे होणार असून याकरिता जिल्हाविभागराज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्य धारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलम्पिक खेळासारखीच आहे.

यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या पुढील जागतिक कौशल्य 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित होणार आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 01 जानेवारी2002 किंवा तदनंतरचा असावा. तसेच आडेटीव्ह मॅन्युफॅक्चरिंगक्लाऊड कम्प्युटिंगसायबर सिक्युरिटीडिजिटल कन्स्ट्रक्शनइंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजीइंडस्ट्री 4.0इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंगमेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दिनांक 1 जानेवारी1999 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे.

फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हाविभागराज्यआणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्नकुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाएमएसएमई टूल रूम्ससिपेटआयआयटीअभियांत्रिकी महाविद्यालयॆतंत्रनिकेतन विद्यालयॆआयएचएम/हॉस्पिटॆलिटी इन्स्टिट्यूटकॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूटस्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठएमएसबीव्हीटीखाजगी कौशल्य विद्यापीठइन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंगइतर सर्व प्रशिक्षण संस्थाकला वाणिज्य विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे अधिनिस्त सर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था विविध व्यवसायिक आस्थापना आणि कारखाने यांच्याकडील विहित वयोमर्यादेतील इच्छुक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेचया स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमुंबई यांच्याकडून करण्यात येईल. यासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन World Skill Competition Registration या लिंकवर भेट देवून दि. 07 जानेवारी 2024  पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक