गोवर रुबेला लसीकरण विशेष मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे


 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गोवर रुबेला लसीकरणासाठी दि.15 ते 25 डिसेंबर 2022 आणि दि.15 ते दि.25 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेत आरोग्य विभागाकडून दि.26 जानेवारी 2023 पर्यंत सर्व लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पथके कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली आहे.

या मोहिमेत 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील डोस देण्याचे राहिलेल्या मुलांना घरोघरी सर्वेक्षण करून नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.  यामध्ये शिल्लक राहिलेला पहिला किवा दुसरा डोस देण्यात येणार आहे.  त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूर्व तयारी करण्यात आली आहे.  तसेच जिल्ह्यात 74 विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.  त्याचप्रमाणे नियमित 1 हजार 760 लसीकरण सत्रामध्ये गोवर लसीकरण केले जाईल.

या सर्वेक्षणात जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे एकूण 9 महिने ते 5 वर्षाच्या आतील डोस राहिलेल्या मुलांची संख्या 670 पहिला डोस व 1 हजार 979 दुसरा डोस राहिलेल्या लाभर्थ्यांची संख्या आहे. या सर्वाचे लसीकरण या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरातील 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचे गोवर रुबेला लसीकरण झाले नसल्यास तत्काळ नजिकच्या आंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्राकडे संपर्क करुन लसीकरणासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, अतिरिक्त  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक