जुने टायर, इनर्व्हटर, इनर्व्हटर बॅटरी विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

अलिबाग,दि.15 (जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील चारचाकी वाहनाचे जुने, निकामी एकूण 7टायर (मोठे-6 टायर, लहान-1 टायर) तसेच जुने नादुरुस्त इर्न्व्हटर नग-1, इर्न्व्हटर बॅटरी 2 नग यांची विक्री करावयाची आहे.

त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.23 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक