पोलादपूर येथील मोरगिरी पिकनिक पॉईंट येथे कातकरी आदिवासी बांधवासाठी शिबीर संपन्न

 


अलिबाग,दि.14(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर येथील मोरगिरी पिकनिक पॉईंट येथे श्रमजीवी संघटना महाड यांच्या सहाय्याने कातकरी आदिवासी बांधवासाठी  (दि.13 डिसेंबर 2022) रोजी शिबीर संपन्न झाले.

 यावेळी तहसिलदार पोलादपूर श्रीमती दिप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय बी.जगताप, वैद्यकीय अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार, आदिवासी विकास विभाग, पेण  या कार्यालयाचे अधिकारी, श्रमजीवी संघटनेचे श्री.विठ्ठल कोळेकर तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

  यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाकडील योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना सांगितली. या शिबिरात उपस्थित कातकरी आदिवासी बांधवांना 10 शिधापत्रिका, 36 निवडणूक (नवीन नाव नोंदणी), 3 लाभार्थ्यांना संजय गांधी योजना लाभ, ई-श्रम पोर्टलवर 31 जणांची नोंदणी, 51 दाखले वाटप,  23 उत्पनाचे दाखले, 28 जातीचे दाखले वाटप करण्यात  आले. तसेच 72 आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक