निवृत्तीवेतन, कुटूंब लाभ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत इंदिरागांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना या योजना शासनाकडून मंजूर करण्यात आल्या असून त्यांची तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे-
इंदिरागांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना-इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ जास्तीत जास्त् लाभार्थ्यांना मिळण्याकरीता मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णयान्वये तसेच जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्राच्या अनुषंगाने शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील  कुटूंबातील 80 टक्क्याहून जास्त अपंगत्व असलेले तसेच एक किंवा बहू अपंगत्व असलेले (दोन किंवा त्यापेक्षा  जास्त अपंगत्व) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योनजेमध्ये निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र राहतील. अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रक्कम रु. दोनशे व राज्य शासनाकडून रक्कम रु.चारशे असे एकूण सहाशे प्रतिमहा निवृत्तवेतन मिळेल. जर असे लाभार्थी असतील तर त्यांनी ताबडतोब तहसिल कार्यालय अलिबाग अथवा संबंधित तलाठी यांचेकडे संपर्क साधावा.
योजनेचे निकष अटी व शर्ती-वय वर्ष 18 ते 65 वर्षाखालील अपंग तसेच कुटूंबाचे नाव ग्रामीण,शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असल्यास त्यास प्रतीमहा प्रती लाभार्थी रु.सहाशे निवृत्ती वेतन मिळेल. दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक (सिविल सर्जन)  यांचे प्रमाणपत्र तसेच तो लाभार्थी 80 टक्क्याहून जास्त अपंगत्व् असलेले तसेच एक किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व्)असलेबाबतचा दाखला असणे आवश्यक.ग्रामपंचायतीच्या,  नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताराची साक्षांकित प्रत,शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, आधारकार्ड अथवा निवडणूक मतदार यादीत नममूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण,नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला. ग्रामसेवक ,तलाठी,मंडळनिरिक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला ही ग्राह्य धरण्यात येईल.तसेच शासनाच्या अन्य कोणत्याही  योजनेखाली नियमित,मासिक,आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरणार नाही.एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करणेचे अधिकार शासनाला सुद्धा राहतील.
राष्ट्रीय कुटूंब योजना- शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या निर्णयानुसार राष्ट्रीय कुटूंबलाभ योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील वय वर्षे 18 ते 59 या वयोमर्यादेतील कोणतीही कमावती व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) जिचे उत्पन्न कुटूंबाचा चरितार्थ चालविण्यांस समर्थ आहेत अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटूंबास एकरकमी रुपये वीस हजार इतके अर्थ सहाय्य देण्यात येते.मृत्यूच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज,फोटो,मृत व्यक्तीचा वयाचा दाखला,दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट असल्याचा ग्रामपंचायतीकडील दाखला,मृत्यूचा दाखला, शिधापत्रिका, अर्जदार यांचे ओळखपत्र (आधारकार्ड), तलाठी,ग्रामसेवक यांच्याकडील रहिवासी दाखला तसेच तलाठी रिपोर्ट जबाब, पंचनामा या बाबींची पूर्तता करुन असे लाभार्थी असतील तर त्यांनी ताबडतोब संबंधित तलाठी व तहसिल कार्यालय, अलिबाग येथे संपर्क साधावा. असे आवाहन तहसिलदार अलिबाग यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक