पनवेल मध्ये विविध विकासकामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातूनच विकास शक्य- ना.चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19:- रचनात्मक विकासासाठी कायद्याच्या चौकटीत राहून महसुली आणि भांडवली जोड द्यावी लागते. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी समन्वयाने योग्य पाऊले उचलली तरच विकास होतो, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज पनवेल येथे केले.
            पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पनवेल व नवीमुंबई भागात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील , सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिति अध्यक्ष मनोहर म्हात्रे , महिला व बाल कल्याण सभापती लिना गरड , माजी उपमहापौर चारुशीला घरत, जगदीश गायकवाड, अभिमन्यु पाटील, एकनाथ  गायकवाड, दिलीप पाटील, चंद्रकांत सोनी,  उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, माजी सभापती दर्शना भोईर, मनोज भुजबळ, डॉक्टर अरुणकुमार भगत, विद्या गायकवाड, अरुणशेठ भगत, जयंत पगडे,  अमित जाधव आणि संजय पाटील  उपस्थित होते. 
आज ना. चव्हाण यांच्या हस्ते खारघर ग्रामपंचायत इमारत येथे प्रभाग अ- विभागीय कार्यालय, रोड पाली (कळंबोली) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन. कळंबोली येथे  प्रभाग ब- विभागीय कार्यालय उद्घाटन, कामोठे येथे प्रभाग -क विभागीय कार्यालय उद्घाटन, जुई कामोठे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आसुडगांव खांदा कॉलनी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन,मोहल्ला (पनवेल)येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन,देवाळी तलाव पनवेल येथे देवाळे तलावाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर महापालिका मैदान, पनवेल येथे ना. चव्हाण यांनी जाहीर सभेस संबोधित केले. आयुक्त गणेश देशमुख,महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक