राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम मतदान हक्क अंमलबजावणीसाठी जागरुक रहा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 25-  लोकशाहीत मतदाराला दिलेला मतदानाच्या अधिकार हा सर्वोच्च आहे. निवडणूकीच्या वेळी आपले मतदान योग्य उमेदवाराला होऊन आपल्या मतदान हक्काची अंमलबजावणी होण्यासाठी आपण जागरुक असलं पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी आज येथे केले.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आज 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘वंचित न राहो कुणीही मतदार’  हे यावेळच्या मतदार दिनाचे घोषवाक्य होते. या निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात नव मतदार, दिव्यांग मतदार व महिला मतदारांचा मोठा सहभाग दिसून आला.
            या कार्यक्रमानिमित्त आज सकाळी   जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयापासून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींनी  मतदार जनजागृती संदर्भात घोषणा देऊन अलिबाग शहरातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
त्यानंतर मेघा चित्रमंदिर येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यसमारंभाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, दिव्यांग संघटनेचे साईनाथ पवार,तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी  उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, प्रत्येक मतदाराने निवडणूकांची माहिती करुन घेतली पाहिजे. चांगला अभ्यासू प्रतिनिधी निवडण्यासाठी आपणही जागरुकपणे व कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी पार पाडली पाहीजे, तेच आपले राष्ट्रीय कर्तव्य होय. चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला तरच आपल्याला चांगल्या सुविधा, सेवा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आपल्या देशाचा विकास होत असतो. त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून निवडणूकीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जे जे नवमतदार आहेत त्यांनी, तसेच दिव्यांग मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात  मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इशस्तवन आणि स्वागत गीत गायनानंतर मतदान गीतही सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर व पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनीही मतदारांशी संवाद साधला व त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर पथनाट्य व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
 यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मतदार जनजागृती व मतदान नोंदणीचे उत्कृष्ट कार्य करणारे स्पर्धक, विद्यार्थी व निवडणूक कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
विविध स्पर्धेतील विजेत्यांची नावे याप्रमाणे-
वक्तृत्व स्पर्धा- वेदांत दिलीप कंटक, जे.एस.एम कॉलेज अलिबाग, प्रथम, मिताली ज्ञानदेव दळवी, पी.एन.पी.कॉलेज  द्वितीय, मयुरेश ज्ञानेश्वर पाटील  जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल तृतीय.
निबंध स्पर्धा- सिंह गुरुप्रीत राजेंद्र, जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल, प्रथम, सिंह परोपकार राजेंद्र को.ए.सो ज्युनिअर कॉलेज द्वितीय,  गौरी गजानन टकले जे.एस.एम. कॉलेज तृतीय.
वादविवाद स्पर्धा- वेदांत दिलीप कंटक, जे.एस.एम कॉलेज अलिबाग, प्रथम, कोमल म्हात्रे  जा. र. ह. कन्याशाळा अलिबाग द्वितीय, वैष्णवी घरत, आर.सीएफ. शाळा  कुरुळ तृतीय.
चित्रकला स्पर्धा (गट -1)- आदिती किरण पाटील प्रथम, दिव्या बिदन मंडळ द्वितीय, दिशा मनोहर थळकर तृतीय.
चित्रकला स्पर्धा (गट-2)- करिष्मा प्रमोद भगत प्रथम, रिया उत्तमराव कांबळे द्वितीय,  गौरी नंदमल कुमावत तृतीय.
चित्रकला स्पर्धा (गट-3)- साहिल संतोष पाटील प्रथम, कौशिल राजेंद्र घरत, द्वितीय, भक्ती किरण राऊत तृतीय.
रांगोळी स्पर्धा- भावेश राजन भोईर, प्रथम, भक्ती किरण राऊत द्वितीय, मनस्वी दिनेश खैरनार तृतीय.
यावेळी उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून प्रविण सहदेव भायदे, हरिश्चंद्र भगवान कुंडल, वंदना विजय पाटील, मनिषा राणे यांना तर मतदार यादी तयार करणारे संकेत सुधाकर सुंकले यांनाही सन्मानित करण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक