आदीवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचे हितगुज



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26- जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त  जिल्हाधिकारी बंगल्यावर आमंत्रित करण्यात आले होते. तेथे त्यांना  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटण्या बोलण्याची संधी मिळाली व स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.या सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांचे कुटूंबियही सहभागी झाल्याने हा सोहळ्या कौटुंबिक सोहळा झाला.
            प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला निवृत्त ॲडमिरल एल. रामदास यांची सपत्निक उपस्थिती होते. या शिवाय जिल्हाधिकारी, त्यांच्या सहधर्मचारीणी डॉ.आरती सूर्यवंशी, त्यांचे अन्य कुटूंबिय या सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर , जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी  रविंद्र मठपती आदींसह जिल्ह्यातील अन्य प्रमुख अधिकारी तसेच पेण आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानातील हिरवळ व बगीचा मध्येबागडण्याचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांच्यासाठी विशेष गोड पदार्थ व अल्पोपहार- भोजन देण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. ‘आई’ या विषयावर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले, कुणी कविता, स्फूट सादर केले. त्यामुळे वातावरणात आपसूक हळुवारपणा आला.  या भेटीची आठवण कायम रहावी म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांना आणि आश्रमशाळ सेवकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक