रायगड पर्यटनः मोबाईल ॲप पर्यटकांच्या सेवेत दाखल



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 26-  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप आज पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले असल्याची घोषणा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज केली. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात  त्यांनी ही घोषणा केली.
 या ॲप मध्ये जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली असून तेथे पोहोचण्याचे मार्ग, वाहतकीची साधने, त्यांच्या उपलब्धता, राहण्याची, जेवणाची उत्तम ठिकाणे , खाद्यपदार्थ आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांना आपत्ती प्रसंगी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांशी साधावयाच्या संपर्काची सोयही या ॲप मध्ये करण्यात आली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याची लिंक https://raigad.nic.in  या रायगड जिल्ह्याच्या वेबसाईटवरही उपलब्ध करण्यात आली आहे. याॲपमुळे रायगड जिल्ह्याचे पर्यटन आता मोबाईलच्या सहाय्याने करणे शक्य होणार आहे. त्याचा पर्यटन वाढीला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक