प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- एकात्मिक फलोत्पादन विकास  अभियान सन 2018-19 मध्ये मनुष्य्बळ विकास कार्यक्रमांतर्गत फळबाग, भाजीपाला,फळबाग व्यवस्थापन,एकात्मिक किड व्यवस्थापन काढणी पश्चात व्यवस्थापन,कृषि पर्यटन इत्यादी विषयावर खोपोली उपविभागाअंतर्गत खालापूर,कर्जत,पनवेल,उरण तालुक्यातील 80 शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील पाच दिवसांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण (On Farm Training)सोमवार दि.4 ते 8फेब्रुवारी या कालावधीत उपविभाग सातारा,जिल्हा सातारा अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गुरुवार दि.31 रोजी सायंकाळी  चार वाजेपर्यंत नांव नोंदणी करावी,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक