राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 :  25 जानेवारी 2019 रोजी 9 वा राष्ट्रीय मतदार दिवस No Voters to be left behind  हा विषय आगामी लोकसभा निवडणूक 2019 समोर ठेऊन निश्चित करण्यात आला असून या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली
             यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, हा कार्यक्रम जिल्हास्तरावर, मतदार संघ स्तरावर, तालुका व मतदान केंद्र स्तरावर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाची मराठी भाषेतील शपथ घेणे, नविन नोंदणी झालेल्या मतदारांना बॅच वितरीत करणे, मतदार नोंदणी जनजागृती EVM/VVPATS जनजागृती बाबत चित्रफित दाखविणे, युवक मतदार महोत्सव साजरा करणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.  राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने शाळा, कॉलेजमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.  सदर कार्यक्रम दि.25 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10.00 वा. मेघा चित्र मंदिर, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
विविध कार्यक्रम
            दि. 25 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वा.जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल, अलिबाग ते मेघा चित्रमंदिरा पर्यंत रॅलीचे आयेाजन करण्यात आले आहे.  निवडणूक व मतदान विषयावर आधारित निबंध स्पर्धा, वादविवाद, स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला,रांगोळी स्पर्धा, यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  तसेच रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.  सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.   मतदार यादी संदर्भात उत्कृष्ठ काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer)  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  9 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने महिला, युवक, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांचा सदर कार्यक्रमात समावेश करुन घेण्यात येणार आहे.  आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने EVM/VVPATS या संबंधी माहितीची चित्रफित तसेच मतदार नोंदणी , समावेशकता इत्यादी बद्दलच्या जन जागृतीबाबत चित्रफित दाखविण्यात येणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक