राष्ट्रीय लोक अदालत 9 मार्च रोजी



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- -राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि. 9 मार्च रोजी  रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
                        सदर लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे,138 एन. आय. ॲक्ट् खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
            राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने ‍निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय  होत  नाही.पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि सदर लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अभय वाघवसे व सचिव जयदिप ज. मोहिते यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक