खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग औद्योगिक क्षेत्राकरिता मनाई आदेश जारी

 

 

रायगड दि.16(जिमाका) :- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली रसायनी रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तीमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याची जातीय व धार्मिक घटना घडत असतात.  त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थितो निर्माण होत आहे. दि. 23 जानेवारी 2024 पासून राज्यस्तरीय महाआंदोलन समितो महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्याध्यक्ष,श्री.जयवंत पोकळे यांच्या नेतृत्वाखाली कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे,कोळीवाड्याचे सिमाकंन करावे, मच्छिमार बांधवाना उर्वरित डिझेल परतावा मिळावा इतर मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे. दि.18 फेब्रुवारी व दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार असून तसेच रायगड पोलीस कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 77 ठिकाणी पुतळा व 23  ठिकाणी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम आयोजित असून एकूण 81 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी शब ए बारात हा मुस्लिम समाजाचा शब ए बारात साजरा करण्यात येणार आहे.

वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित रहावी तसेच राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षत्राच्या हद्दीत दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी 00.01 वा. ते दि.01 मार्च 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत या कालावधीकरिता मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) मधील (अ), (ब), (क), (ङ), (ई) व (फ) प्रमाणे खालील कृत्ये करण्यास या अधिसूचनेदार मनाई करण्यात आली आहे.

 शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे काठया किया लाठ्या अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे,सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषण किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हें अगर कोणतीही तत्सम वस्तु, जिन्नस तयार करणे किवा लोकांत प्रसार करणे, रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस मनाई राहील.

ही अधिसूचना वरिष्ठाच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणं आवश्यक आहे, अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही. सदर अधिसूचना ही खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही.

तथापि या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही, याची जबाबदारी आयोजकावर राहील या अटीवर परवानगी द्यावी.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक