पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीतांच्या बहारदार कार्यक्रमात रायगडकर रसिक तल्लीन

 


 

रायगड दि.15(जिमाका):- कोकणातील पारंपरिक लोककला त्याचबरोबर कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव परपंरांवर आधारित पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीत तसेच सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या मराठी सांगीतिक कार्यक्रमाने (बुधवार,दि.14 फेब्रुवारी) रोजी रायगडकर रसिक तल्लीन झाले. या दोन्ही कार्यक्रमाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा मराठी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 कलाकारांचा पोवाडा, लोकगीते, पारंपरिक गीतांच्या बहारदार कार्यक्रमात रसिक तल्लीन झाले अन्‌ त्यांनी या कलाविष्काराला भरभरून दाद दिली.

 शुभेच्छा देताना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांचा मराठी सांगीतिक दिमाखदार कार्यक्रम अलिबाग येथे संपन्न झाला.  ही अलिबाग साठी मोठी सुखद गोष्ट आहे. त्यांच्या घराण्याचे  नाव  जागतिक पातळीवर घेतले जाते. . या कार्यक्रमाचा रायगडकरांनी आस्वाद घेवून, भरभरुन दाद दिल्या बद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

 उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी  सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा आगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत महानाट्य शिवबा होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले.

000000000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक