अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड यांची जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागस सदिच्छा भेट

 


 

रायगड दि.15(जिमाका):- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई येथील अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड यांनी  जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग,आयसीटीसी, एआरटी केंद्र, रक्तपेढी, गुप्तरोग विभागास सदिच्छा भेट देवून सदरील विभागाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.

सर्व प्रथम अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल  जोशी यांनी अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय कंदेवाड याना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  या भेटी दरम्यान डॉ.विजय कंदेवाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी डापकू कार्यालयामार्फत केल्या गेलेल्या कामाचा सविस्तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आढावा दिला. त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 14 स्टॅन्ड आलोन आयसीटीसी, 1 मोबाइल आयसीटीसी व्हॅन, 1 तीन टेस्ट पीपीपी, 63 एफआयसीटीसी प्राथमिक आरोग्य केंद्र, 123 एफआयसीटीसी पीपीपी  (64 Type ‘B’ PPP, 59 Type ‘C’ PPP), 3 एआरटी केंद्र (1 MSACS, 2 खाजगी), तसेच 11 लिंक एआरटी केंद्र, 1 DSRC केंद्र, 5 रक्तपेढी ( 4 नको अनुदानीत 1 खाजगी), 3 एनजीओ, 1 CSC केंद्र  कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.   लिंक वर्कर कार्यक्रमामध्ये 8 लिंक वर्कर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.  

            यावेळी  एप्रिल 2014 ते डिसेंबर 2023 पर्यंतचा अहवाल  सादर करण्यात आला. त्यामध्ये जनरल तपासणीचे  काम हे 132 टक्के असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये  3 हजार 532 व्यक्ती या एचआयव्ही पॉझिटिव्ह  तर एएनसी तपासणीचे काम हे १०९ टक्के असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये  164 एएनसी या एचआयव्ही पॉसिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्या ऑन एआरटी झाल्या असल्याबाबत सांगितले. अलिबाग येथे सन 2012 पासून एआरटी केंद्र सुरु झाले असून त्यापूर्वी रायगडमधील एचआयव्ही  पॉझिटिव्ह  रुग्ण हे मुंबई येथे रजिस्टर होत होते.

           पॉझिटिव्ह   एएनसीच्या बच्चूची डीबीएस तपासणी 6 वीक, 06 महिने, 12 महिने, 18 महिन्यानी केली जाते. त्यामध्ये  पॉझिटिव्ह  आल्यास त्यांना एआरटी उपचार चालू केले जातात. रायगड जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून आलेल्या बच्चूची सुद्धा डीबीएस तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सर्व बच्चू निगेटिव्ह आलेले असून प्राथमिक अवस्थेत पालकांकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यामध्ये शासनाला 100 टक्के यश आले  आहे.

         तळोजा जेल येथे मोबाइल आयसीटीची वरील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यामार्फत एचआयव्ही तपासणी केली जाते.  तेथे आलेले एचआयव्ही  पॉझिटिव्ह  याना एआरटी उपचार दिले जातात. परंतु  पॉझिटिव्ह पेशंट हे बेल वर सुटल्यानंतर ते कोठे जातात, राहतात ते औषधोपचार घेतात की नाही याची माहिती मिळत नाही.  याकरिता साथी या संस्थेची मदत घेण्यास सांगितले.

         रायगड जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी मार्फत एचआयव्ही तपासणी बरोबरच व्हीडीआरएल, एचबीएस्सी, एचसीव्ही  तपासण्या केल्या जातात. परंतु सध्यस्थितीत व्हीडीआरएल, एचबीएस्सी, एचसीव्ही  किटची कमतरता आहे. तरी त्याचा पुरवठा करणेबाबत चर्चा करण्यात आली. सदरचे एचबीएस्सी, एचसीव्ही किट एनएचएम अथवा इमरजेंसी फंड यामधून मिळविणेकरीता  प्रस्ताव ठेवणे बाबत सांगण्यात आले. व्हीडीआरएलची तपासणी  जनरल लॅब किंवा एचएलएल यांच्या मार्फत करून घेण्याबाबत सांगण्यात आले.

                 हॉस्पिटलमधील सर्व मेडिकल, पॅरा मेडिकल स्टाफची रेगुलर एचआयव्ही, HBsAg, HCV ची  तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांस PEP बाबत माहिती देणे, तसेच मासिक आढावा सभेमध्ये याबाबत चर्चा करण्याबाबत सांगण्यात आले.  यावेळी त्यांनी walk in cooler (शीतगृह ) ला भेट दिली व कामकाज समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक