उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षांसंदर्भात नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

 

रायगड दि.16(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि.21 फेब्रुवारी 2023 ते दि.19 मार्च 2024  या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा दि.01 मार्च 2024 ते दिनांक 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, वाशी नवी मुंबईचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक/शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दि.15 फेब्रुवारी 2024 पासून कार्यान्वित करण्यात आली असून या नियंत्रणकक्षाचे कामकाज सकाळी 9.00 ते रात्री 7.00 या वेळेत सुरु राहील.

मुंबई विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचारी यांची नावे व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक इ. तपशील पुढीलप्रमाणे आहेत. हेल्पलाईनसाठी दूरध्वनी क्रमांक: (022) 27893756/27881075.

कार्यालयातील हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी  वरिष्ठ अधीक्षक तथा प्र.सहसचिव, श्रीम. शुर्भागी भोसले, मो.9833369330, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.),श्रीम.छाया मेढेकर,9869489606, वरिष्ठ अधीक्षक दिलीप नांदगावकर, 8779062029, वरिष्ठ अधीक्षक नयन म्हात्रे, 9819806109.

अंतर्गत समुपदेशक- श्रीकांत शिनगारे, 9869634765, मुरलीधर मारे, 7977919850/9322105618,022-27893756/27881075.

बहिर्गत समुपदेशक-  हयाळीज बी. के.9423947266, अनिलकुमार दि. गाढे 9969038020, जाधव विकास नारायण

9867874623, विनोद पन्हाळकर,9527587789, संजय जाधव,9657079344/9422594844,चंद्रकांत ज. मुंढे,8169699204अशोक देवराम सरोदे, 9322527076/8888830139, श्रीम. शैलजा मुळये,9820646115, शेख अखलाक अहमद अ. रज्जाक,9967329370, श्रीम. स्नेहा अजित चव्हाण 8369015013, श्रीम.उज्वला क. झारे,9920125827,सी. स्मिता शिपुरकर,9819016270.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक