प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी मराठी भाषा समिती स्थापन

 


 

अलिबाग, दि.10 (जिमाका):- प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा वापरासंबंधीच्या तक्रारी व निवारणासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम 2021, अधिसूचना दि.16 जुलै 2021 महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.  या अधिनियमातील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करुन तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापना या सर्व कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व मराठी भाषेसंदर्भातील उपक्रम राबविण्यासाठी या अधिनियमातील नियम 5 ड नुसार मराठी भाषा समिती गठीत करण्याचे नमूद आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मराठी भाषा समिती गठीत केली असून अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे असून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील हे सदस्य सचिवपदी आहेत. समितीचे सदस्य म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी  अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पनवेल महानगरपालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्री.मकरंद प्रभाकर बारटक्के, मु.पो.ता.रोहा, श्रीमती सुजाता पाटील, मुख्याध्यापिका, सृजन विद्यालय, कुरुळ, माजी अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद सन 2019-20, श्री.चंद्रशेखर कमलाकर देशमुख, मु.पो.इंदापूर,ता.माणगाव, क.रा.देशमुख ज्ञानपोई पाणपोई ग्रंथालय, माणगाव, श्रीमती शोभाताई सावंत, मु.पो.ता.महाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती या समितीचे सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक