ई-संजीवनी ओ.पी.डी.मार्फत डॉक्टरांचा सल्ला मिळवा घरबसल्या

 


 

अलिबाग जि.रायगड,दि.11 (जिमाका):- "हॅलो…डॉक्टर साहेब पोट दुखतंय, खोकला येतोय, औषध सांगा अशा प्रकारचा ऑनलाईन संवाद केवळ ई-संजीवनी ओ.पी.डी. मुळे शक्य झाला आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयामध्ये जाऊन रांगेत उभे न राहता घरबसल्या मोफत उपचार मिळत आहेत. या वैद्यकीय सुविधेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

राज्यात गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये शासनप्रणित ई-संजीवनी ऑनलाईन मोफत ओ.पी.डी. सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 16 महिन्यात या सेवेचा 93 हजार 649 रुग्णांनी लाभ घेतला आहे.

सोमवार ते रविवार सकाळी 09.30 ते दुपारी 1.00 आणि तर दुसऱ्या सत्रात दुपारी 01.45 ते सायंकाळी 5.00 या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येतो. यामध्ये "एस.एम.एस." द्वारे ई-प्रिस्क्रीप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रीप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.

या योजनेचा वापर करताना लॉग-इन करताना कुणाला काहीही अडचण येत असेल तर जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग यांना csraigad७०@gmail.com या ई-मेलवर कळवावे.

ई-संजीवनी ओ.पी.डी. करिता असे करा रजिस्ट्रेशन:-

1) ई-संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात. ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे अॅप (App) डाऊनलोड करता येईल, 2) आपला मोबाईल नंबर OTP (One Time Password) द्वारे सत्यापित (Verify) करावा, 3) मोबाईल नंबर सत्यापित (Verify) झाल्यानंतर टोकन (TOKEN) जनरेट करावे, 4) टोकन (TOKEN) जनरेट झाल्यावर लॉग-इन करावे, 5) लॉग-इन झाल्यावर तुमची माहिती भरुन तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करुन डॉक्टरांसोबत सल्लामसलत करावे, 6) त्यानंतर ई-प्रिस्क्रिप्शन डाऊनलोड करावे,

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी ई-संजीवनी ओ.पी.डी. या वैद्यकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक