महाड पूरग्रस्तांच्या नुकसान पंचनाम्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर

 


अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- दि.22 व 23 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत जवळपास पूर्ण झाले आहेत.  महाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात पूरामुळे नुकसान झालेल्या घरे, झोपडी, गोठा, दुकाने, टपरी यांच्या पंचनाम्याची माहिती पुढीलप्रमाणे-

महाड शहर विभाग पंचनाम्यांची संख्या- पाणी शिरुन नुकसान झालेली घरे पूर्णत-56, अशत: 4 हजार 577  असे एकूण 4 हजार 633.  नुकसान झालेली घरे (इमारती) पक्की घरे पूर्णत:21, कच्ची घरे-7, एकूण-28, अंशत: पक्की घरे-760, कच्ची घरे-34,एकूण-794. दुकाने- पूर्णत:67, अंशत:-2 हजार 562, एकूण-2 हजार 629. टपरी- पूर्णत:6,अंशत:-53, एकूण-59. गोठे- पूर्णत:2, अंशत:-10, एकूण-12. झोपडी- पूर्णत:10, अंशत:-9, एकूण-19.

महाड ग्रामीण विभाग पंचनाम्यांची संख्या- पाणी शिरुन नुकसान झालेली घरे पूर्णत-38, अंशत: 5 हजार 72  असे एकूण 5 हजार 110.  नुकसान झालेली घरे (इमारती) पक्की घरे पूर्णत:24, कच्ची घरे-16, एकूण-40, अंशत: पक्की घरे-1 हजार 99, कच्ची घरे-37,एकूण-1 हजार 136. दुकाने- पूर्णत:6, अंशत:-1 हजार 74, एकूण-1 हजार 80. टपरी- पूर्णत:1, अंशत:-56, एकूण-57. गोठे- पूर्णत:5, अंशत:-98, एकूण- 103. झोपडी- पूर्णत:0, अंशत:-7, एकूण-7.

असे एकूण पाणी शिरुन नुकसान झालेली घरे पूर्णत-94, अंशत: 9 हजार 649 असे एकूण 9 हजार 743.  नुकसान झालेली घरे (इमारती) पक्की घरे पूर्णत:45, कच्ची घरे-23, एकूण-68, अंशत: पक्की घरे-1 हजार 859, कच्ची घरे-71,एकूण-1 हजार 930. दुकाने- पूर्णत:73, अंशत:-3 हजार 636, एकूण-3 हजार 709. टपरी- पूर्णत:7, अंशत:-109, एकूण-116. गोठे- पूर्णत:7, अंशत:-108, एकूण-115. झोपडी- पूर्णत:10, अंशत:-16, एकूण-36.  तसेच शहरी व ग्रामीण भागातील जनावरे संख्या-467. यामध्ये मौजे तळीये ता.महाड येथील पंचनामे समाविष्ट नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक