ई-पिक पाहणी कार्यक्रमाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा वस्तुनिष्ठ पीक पेऱ्याची व पिकांची माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

            ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे इत्यादी उद्देशाने पीक पेरणीची माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी ही माहिती स्वतः भ्रमणध्वनीद्वारे मोबाईल ॲप च्या माध्यमातून "ई पीक पाहणी" हा कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून राबविण्यात येणार आहे. त्यांच्या तांत्रिक व इतर अनुषंगीक बाबींच्या सहाय्याने व सहकार्याने दि. 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या हा कार्यक्रम राबविण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.

            त्यानुषंगाने जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांची जिल्हा समन्वयक उपजिल्हाधिकारी व कृषी उपसंचालक रायगड श्री.दत्तात्रय काळभोर यांची सहजिल्हा समन्वयक कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सनियंत्रण समितीही गठीत करण्यात आली आहे.

             रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी, नागरिकांनी पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने, खरीप हंगाम 2021-22 मध्ये उभ्या पिकांच्या पीक पाहणी प्रकल्पांतर्गत मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीच्या कामकाजाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारा गुगल प्ले स्टोअर/वेब लिंकवरुन ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे व ई-पीक पाहणीच्या नोंदी स्वतः घ्याव्यात.

            तसेच याबाबत शेतकऱ्यांनी, नागरिकांनी ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, संबंधित मंडळ अधिकारी (महसूल), मंडळ अधिकारी (कृषी), तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी  चौधरी आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक