एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधील इयत्ता 6 वी च्या नियमित तर 7 वी ते 9 वी च्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित,आदिम जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):-  सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विभाग विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमांच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधील इयत्ता 6 वी च्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 त्यासाठी https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून त्यासोबत मागील वर्षाची नवीन 900 गुणांचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्यांनी सरल पोर्टलवरील स्टुडन्ट आयडी माहीत असणे आवश्यक आहे. आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दि.31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे.

 राज्यातील कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. तसेच पालकांचा मूळ राहण्याचा पत्ता विचारून घेवून गुणानुक्रमे नजिकच्या एकलव्य शाळेत प्रवेश देण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण श्रीमती शशिकला अहिरराव यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक