स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त “फिट इंडिया फ्रीडम रन” चे शिरढोण येथे यशस्वी आयोजन

 


अलिबाग,जि.रायगड, दि.13 (जिमाका):-  येथील पनवेल तालुक्यातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीत शिरढोण येथे "स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी रॅली" तसेच फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते.

   भारत सरकारच्या कला क्रीडा व युवा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र रायगड, रुरल एन्ड यंग फौंउडेशन,  ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) आणि ग्राम पंचायत शिराढोण यांच्या  वतीने शुक्रवार, दि. 13 ऑगस्ट  रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीत म्हणजेच हुतात्मा स्मारक शिरढोण येथे  सकाळी 10.30  वाजता "स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी रॅली" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ.जी. जी.पारीख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, रायगड रुलर व यंग फाउंडेशन अध्यक्ष सुशील साईलकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, नेहरु युवा केंद्राचे निशांत रौतेला,  नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर काहींना तुरुंगवास भोगावा लागला. अशा अनेक बलिदानातून दि.15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षभरात भारतीय स्वातंत्र्याची समर गाथा युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

 आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीत या कार्यक्रमात दि.09 ऑगस्ट 1942 ला अंग्रेजो भारत छोडो म्हणत चले जाओ ची घोषणा देणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील 98 वर्षीय स्वातंत्र सैनिक डॉ. जी. जी. पारीख यांना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

 यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देण्यासाठी फिट इंडिया फ्रीडम रन 2.0  च्या यंदाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये प्रतिज्ञा, राष्ट्रगीत सादर करणे, फ्रीडम रन, कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम, सहभागासाठी युवा स्वयंसेवकांमध्ये जागरूकता आणि त्यांच्या गावांमध्ये अशाच फ्रीडम रनचे आयोजन याचा समावेश आहे.

लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ खेळणे यासारख्या तंदुरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून मुक्तता मिळविणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  यातील फिटनेस का डोस आधा घंटा रोज मोहिमेद्वारे नागरिकांनी रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन संतोष ठाकूर यांनी यावेळी केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक