राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथील इयत्ता 8 वी ची प्रवेशपात्रता परीक्षा दि.18 डिसेंबर रोजी पुणे येथे

 


अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):-  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे.  ही परीक्षा दि. 18 डिसेंबर 2021 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे, याची नोंद घ्यावी.

 या परीक्षेसाठी उमेदवाराचे (विद्यार्थ्यांचे) वयोमर्यादा (वय) दि.01 जुलै 2022 रोजी 11 1/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थ्याचा उमेदवाराचा जन्म दि.02 जुलै 2009 च्या आधि व दिनांक आणि 01 जानेवारी 2011 च्या नंतरचा नसावा अशी प्रवेशासाठी वयाची अट आहे.

 शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी (उमेदवार) दि.01 जुलै 2022 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला असावा.

 परीक्षा शुल्क : आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता.

 परीक्षेसाठी मा.कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांच्याकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचा आहे. जनरल संर्वगातील विद्यार्थी (उमेदवारा) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु 555/- चा डीडी कमांडंट "राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल भवन, डेहराडून, बँक कोड नं. (01576) च्या नावाने काढावा. हा डी.डी.मा.कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, 248003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती/जमाती करीता डी.डी.सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत/छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी.पाठविताना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोडसह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तीक स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.

ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा.कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्म) ची मागणी आपण करू शकता.

 आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा.आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे 411001 या पत्त्यावर दि. 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत पोहचतील, अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत. अंतिम मुदतीनंतर उशीराने आलेले आवेदनपत्र (फॉर्म) कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वीकारले जाणार नाहीत.

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय यांचे पत्र क्र. A/36105/GS/MT-6/D (GS-II) दि. 03 सप्टेंबर 2014 नुसार केंद्र सरकारी नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यामध्ये संबंधीत कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे त्या ठिकाणी देवू शकतात. त्या मुलांची निवड त्यांच्या मूळ अधिवास राज्यानुसार होईल आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल. उमेदवार (विद्यार्थी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितो त्याच राज्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

आवेदनपत्र (फॉर्म) 2 प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-

जन्म दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी), अनुसूचित जाती जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी),अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (झेरॉक्स कॉपी),शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे, आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे (उमेदवाराचे) आधारकार्डची छायांकित प्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल, आवेदनपत्र भरताना 4 पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत, त्यापैकी 2 फोटो आवेदनपत्रावर (फॉर्मवर) चिकटवून त्याखाली उमेदवाराने (विद्यार्थ्याने) स्वाक्षरी करावी व 2 फोटोंच्या पाठीमागे नावाव स्वाक्षरी करून फॉर्म सोबत जोडावे. या कागदपत्रांच्या छायांकित प्रती ( झेरॉक्स कॉपी मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून) आवेदनपत्रासोबत फॉर्मसोबत जोडावेत.

परीक्षेचे वेळापत्रक- शनिवार दि.18 डिसेंबर 2021 रोजी गणित विषयासाठी वेळ सकाळी 9.30 ते 11.00 वाजेपर्यंत यासाठी गुण 200. सामान्य विज्ञान विषयासाठी वेळ दुपारी 12.00 ते 1.00 वा. वाजेपर्यंत, यासाठी गुण-75, इंग्रजी विषयासाठी वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत, यासाठी गुण 125.

 लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होवून मौखिक परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना त्यांचा मौखिक परीक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक