छत्रपती राजाराम महाराज उद्योजक व कौशल्य विकास अभियान शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन कर्तृत्व घडवा सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांचे आवाहन अलिबाग जि. रायगड दि. 2 (जिमाका)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. या प्रगतीत समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतः उद्योजक व्हावं आणि इतरांनाही रोजगार देऊन आभिमान वाटेल असे कर्तृत्व घडवावे, असे आवाहन सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल येथे केले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठा सांस्कृतिक समिती पनवेल यांच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोकण विभाग म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई, जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक ए. जी. पवार, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रायगड जिल्हा समन्वयक अंजली पाटील, सांगली जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक आनंद आंबेकर, रामदास शेवाळे, मराठा सांस्कृतिक समिती, पनवेलचे राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्यात उपस्थित युवकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थित आधिकार्यांपनी आपापल्या विभागाच्या योजना व त्यांच्या लाभ घेण्याविषयीची प्रक्रिया सांगितली. तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकता विकास व कौशल्य विकास या विषयी ए. जी. पवार यांनी माहिती दिली. तसेच महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी शासनाच्या www. mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या रोजगार, स्वरोजगार संधींची तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती विनामुल्य उपलब्ध असते असे सांगितले. तर अंजली पाटील यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आदी योजनांची माहिती दिली. शासनाच्या योजनांचा लाभ घ्या- नरेंद्र पाटील यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, समाजातील होतकरू, गरीब युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे हे समाजातील जाणकार लोकांचे कर्तव्य आहे. त्यांनी युवकांना कर्ज मिळवण्यासाठी व उद्योग स्थापण्यासाठी मार्गदर्शन करावे. महामंडाळाच्या योजनांमधून घेतल्या जाणार्याय कर्जासाठी स्वतः सरकार जामीन राहणार असल्याने कर्ज मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तरी तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात आमदार ठाकूर म्हणाले की, देशातली अर्थव्यवस्था ही वाढत्या विकास दराकडे झेपावत आहे. क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे लक्षण आहे. अशावेळी मराठा समाजाच्या युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वरोजगाराकडे वळावे. समाजाच्या स्वयंपूर्णतेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी युवकांनी अभिमान वाटेल असे कर्तृत्व घडावे असे आवाहन आ. ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजकुमार पाटील यांनी केले. तर सूत्र संचालन श्रीमती रुपाली राणे यांनी केले. कार्यक्रमाला युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकराज्य स्टॉलला प्रतिसाद लोकराज्य वाचक अभियानाचा भाग म्हणून सदर मेळाव्यात जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या वतीने लोकराज्य विक्री व वर्गणीदार करण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला मेळाव्यास उपस्थित युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर मेळाव्यात शासकीय योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य हे माहितीपूर्ण मासिक असल्याचे युवकांना सांगण्यात आले. 00000






अलिबाग जि. रायगड दि. 2 (जिमाका)-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. या प्रगतीत समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतः उद्योजक व्हावं आणि इतरांनाही रोजगार देऊन आभिमान वाटेल असे कर्तृत्व घडवावे, असे आवाहन सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल येथे केले.
पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठा सांस्कृतिक समिती पनवेल यांच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोकण विभाग म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई, जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक ए. जी. पवार, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रायगड जिल्हा समन्वयक अंजली पाटील, सांगली जिल्हा समन्वयक सर्जेराव पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक आनंद आंबेकर, रामदास शेवाळे, मराठा सांस्कृतिक समिती, पनवेलचे राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर मेळाव्यात उपस्थित युवकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थित आधिकार्‍यांनी आपापल्या विभागाच्या योजना व त्यांच्या लाभ घेण्याविषयीची प्रक्रिया सांगितली. तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँकेचे आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकता विकास व कौशल्य विकास या विषयी ए. जी. पवार यांनी माहिती दिली. तसेच महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी शासनाच्या www. mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या रोजगार, स्वरोजगार संधींची तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती विनामुल्य उपलब्ध असते असे सांगितले. तर अंजली पाटील यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास, विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आदी योजनांची माहिती दिली. 
शासनाच्या योजनांचा लाभ घ्या- नरेंद्र पाटील
यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, समाजातील होतकरू, गरीब युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे हे समाजातील जाणकार लोकांचे कर्तव्य आहे. त्यांनी युवकांना कर्ज मिळवण्यासाठी व उद्योग स्थापण्यासाठी मार्गदर्शन करावे. महामंडाळाच्या योजनांमधून घेतल्या जाणार्‍या कर्जासाठी स्वतः सरकार जामीन राहणार असल्याने कर्ज मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तरी तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात आमदार ठाकूर म्हणाले की, देशातली अर्थव्यवस्था ही वाढत्या विकास दराकडे झेपावत आहे. क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हे अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे लक्षण आहे. अशावेळी मराठा समाजाच्या युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वरोजगाराकडे वळावे. समाजाच्या स्वयंपूर्णतेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी युवकांनी अभिमान वाटेल असे कर्तृत्व घडावे असे आवाहन आ. ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजकुमार पाटील यांनी केले. तर सूत्र संचालन श्रीमती रुपाली राणे यांनी केले. कार्यक्रमाला युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकराज्य स्टॉलला प्रतिसाद
लोकराज्य वाचक अभियानाचा भाग म्हणून सदर मेळाव्यात जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या वतीने लोकराज्य विक्री व वर्गणीदार करण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला मेळाव्यास उपस्थित युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर मेळाव्यात शासकीय योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य हे माहितीपूर्ण मासिक असल्याचे युवकांना सांगण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक