पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7- बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि.9 रोजी सायंकाळी सहा वा. धोणखार चणेरा ता.रोहा येथे आगमन व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.  सात वा. धोणखार चणेरा येथून रोहाकडे प्रयाण.  साडेसात वा. रोहा येथे आगमन व भाजप कार्यकर्त्यां समवेत बैठक. स्थळ : ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा शहर.  साडेआठ वा. रोहा येथून महाडकडे प्रयाण.  दहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथे आगमन व मुक्काम. 
सोमवार दि. 10 रोजी  सकाळी साडेआठ वा. हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ : हुतात्मा स्मारक महाङ  अकरा वा. रायगड लोकसभा मतदार संघ भाजपा पदाधिकारी बैठक.  स्थळ : पी.जी.हॉटेल महाङ  दुपारी तीन वा. सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ : भेलोशी विद्यालय महाङ  चार वा. महाड येथून गोरेगाव ता.माणगावकडे प्रयाण.  साडे चार वा. गोरेगाव ता.माणगाव येथे आगमन व भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.  स्थळ : सार्वजनिक वाचनालय सभागृह गोरेगाव.  सायंकाळी साडे पाच वा. गोरेगाव येथून माणगावकडे प्रयाण.  सहा वा. माणगाव येथे आगमन व सौ.प्राजक्ता शुक्ला यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ : मंगलमूर्ती संकुल वैद्य हॉस्पिटल जवळ कचेरी रोड माणगाव.  सव्वा सहा वा. माणगाव येथून इंदापूरकडे प्रयाण.  साडे सहा वा. इंदापूर येथे आगमन व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती.  स्थळ : मंगेश मंगल कार्यालय, इंदापूर ता.माणगाव.   साडेसात वा. इंदापूर येथून मुंबईकडे  प्रयाण. 
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक