मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना



अलिबाग दि.15, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत (CMEGP) राज्याच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, रायगड अलिबाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत ग्रामीण शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरु केली आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींच्या औद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरु केलेल्या या योजने द्वारे कृषी कृषीवर आधारीत उद्योग, उत्पादन सेवा आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे. यामध्ये उत्पादन उद्योगांकरीता रु.50 लाख सेवा उद्योगांकरीता रु.10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. यामध्ये शासनमार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के शहरी भागातील लाभार्थ्यांकरीता 15 ते 25 टक्के अनुदान दिले जाते.
नुकत्याच सुरु झालेल्या या योजनेद्वारे या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबाग कार्यालयाकडून 225 ग्रामोद्योग मंडळ रायगड कार्यालयाकडून 155 युवक युवतींची निवड करुन उद्योग व्यवसायाची संधी दिली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या प्रकल्पासह प्रशिक्षण, बँकाकडून कर्जाची उपलब्धता आदिसाठी शासनाकडून सर्वातोपरी सहकार्य केले जाणार आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास, जातीचा दाखला, प्रशिक्षण दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, प्रकल्प अहवाल, अपंग असल्यास त्याविषयीचा दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
योजनेमध्ये सहभागाकरीता पात्रतेच्या अटी :- अर्जदाराचे वय किमान 18 ते 45 वर्ष असावे मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सुट राहील. शैक्षणिक पात्रता रु.10 लाखाच्या वरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण 25 लाखाच्या वरील प्रकल्पाकरींता 10 वी उत्तीर्ण. अर्जदाराने यापूर्वी केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने http://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर सादर करावे. हेल्पालाईन नं.18602332028/022-22023912 असा आहे. जिल्हा उद्योग केंद्र, रायगड अलिबाग रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी मदत करणेकामी-सहाय्यता कक्ष-सुरु करण्यात आला आहे. तरी अर्जदारांनी कागदपत्रांसह श्रीमती रागीणी प्रमोद क्षेमकल्याणी, भ्रमणध्वनी क्र.9158889104/02141-222099 यांचेशी संपर्क साधावा.
तरी जिल्ह्यातील सर्व युवक-युवती रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबाग यांचे वतीने आवाहन करण्यात येत की, सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक