हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.08-  उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेची तालुकास्तरीय कार्यशाळा भाग्यलक्ष्मी हॉल चेंढरे अलिबाग येथे संप्पन्न झाली.
या कार्यशाळेला आमदार सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, अलिबाग पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, तहसिलदार अलिबाग सचिन शेजाल, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड-अलिबाग प्रकाश देवऋषी, सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता अलिबाग एस.जी.पवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग गणेश वाडेकर, जिल्हा समन्वयक श्रीम.उज्वला भोसले, श्रीम.एस.बी.पाटील आदि उपस्थित होते.
हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना जिल्ह्यातील बचत गटांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणार असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहेत.  या समितीद्वारे प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करुन त्यातून बचत गटांची निवड करण्यात येणार आहे.  त्यानंतर तालुकास्तरीय निवड झालेल्या बचत गटांची जिल्हास्तरीय समितीद्वारे जिल्हास्तरीय निवड होणार असून जिल्हास्तरीय निवड झालेल्या बचतगटांना या योजनेतून अनुदान दिले जाणार असल्याची माहिती  सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता अलिबाग एस.जी.पवार यांनी यावेळी उपस्थित  महिलांना दिली.
यावेळी आमदार सुभाष  ऊर्फ पंडितशेठ पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड-अलिबाग प्रकाश देवऋषी यांनीही आपली यथोचित मनोगते व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश धुमाळ यांनी केले. तहसिदार सचिन शेजवल यांनी आपल्या प्रास्ताविकात शासनाच्या नाविण्यपूर्ण असलेल्या या  योजने विषयीची संकल्पना विषद करुन सांगितली.  तर आभार गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग गणेश वाडेकर यांनी मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक