जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कमिटी आढावा बैठक संपन्न




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.07-  जिल्ह्याधिकारी रायगड डॉ.  विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली  आज जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कमिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड - अलिबाग या विभागाची  त्रैमासिक आढावा बैठक घेण्यात आली.
                     यावेळी  ओएनजीसी कंपनी, उरण प्लॅन्ट यांच्याकडून पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याचे अनावरण करण्यात आले व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कमिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड - अलिबाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी श्री. नरेंद्र असीजा, ED-Plant Manager, श्री. जॉर्ज केरकेट्टा, GM-I/C HR ER, श्री. भूपेंद्र श्रुंगी , GM-Instrumentation, श्री. प्रभाकर कुमार, Manager(HR), श्री. गौरव पतंगे, Sr. HR Executive-CSR. इक्बाल शेख उपस्थित होते.
                         ओएनजीसी उरण प्लॅन्ट या कंपनी ने त्याच्या  सीएसआर फंडामधून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक आयसीटीसी केंद्राकरिता अत्यंत आवश्यक असणारे लॅब इक्विपमेंट यामध्ये  LG  LED टी व्ही, ३२ GB पेनड्राईव्ह, टीओआर/रेफ्रिजरेटर,  सेंट्रिफुज मशीन, मे मायक्रोप्रिपेट, फ्रिजकरिता थर्मामीटर, डिजिटल timer  चा पुरवठा केला आहे. याबद्दल  डॉ सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड, डॉ. प्रमोद गवई, अतिरिक्त  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. प्रवीण जोगळेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य),  श्री. नरेंद्र असीजा, ED-Plant Manager, डॉ. सुरेश देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, श्री. मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी,   व श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग रायगड अलिबाग, डॉ. दीपक गोसावी, रक्त संक्रमण अधिकारी यांना गौरविण्यात आले. 
                  सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून व डीपीडीसी फंडातून डापकु, आयसीटीसी व एआरटी केंद्राकरिता अत्यंत महत्वाचे साहित्य मिळविणेकरिता पाठपुरावा केल्याबद्दल श्री. संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, श्री. नवनाथ लबडे, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक व श्री.रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक लेखा, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग रायगड अलिबाग यांना डॉ. सुर्यवंशी यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. 
                               ओएनजीसी कंपनी, उरण प्लॅन्ट यांनी पुरवठा करण्यात आलेल्या साहित्यामुळे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामध्ये व्यापक प्रमाणात एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती करणे शक्य झालेले आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व आयसीटीसीमध्ये एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करणेकरीता आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तपासणीचा अहवाल वेळेत व अचूक देणेकरिता सहकार्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा मुंबई याच्या मार्फत प्रत्येक आयसीटीसी करीत पाठविण्यात आलेल्या एचआयव्ही तपासणी किट या त्यांच्या आयसीटीसी केंद्रामध्ये फ्रिज करून ठेवणेकरिता व तापमानाच समतोल राखण्याकरिता मदत झालेली आहे. प्रत्येक आयसीटीसी केंद्रामध्ये होणाऱ्या एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यास मदत  झालेली आहे. सदर साहित्य मिळवून देण्याकरिता  श्री. प्रभाकर कुमार, Manager(HR), ओएनजीसी कंपनी उरण प्लॅन्ट  यांनी विशेष परिश्रम घेतले असून डापकु मार्फत सुसज्य नवीन मोबाईल व्हॅन मिळणेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आलेला असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.     
               जे,एस,डब्ल्यू स्टील प्रा. लि. डोलवी, तालुका  पेण  या कंपनीने त्याच्या  सीएसआर फंडामधून आयसीटीसी केंद्राकरिता अत्यंत आवश्यक असणारे लॅब इक्विपमेंट यामध्ये  सिरिंजवीथ निडल, प्लेन ट्युब विथ कॅप व यल्लोटीप्स या साहित्याचा पुरवठा करून अत्यंत मोलाचे सहकार्य केले.  सदर साहित्य मिळवून देण्याकरिता श्रीम. संहिता चॅटर्जी, सीएसआर ज्युनिअर मॅनेजर, जे,एस,डब्ल्यू स्टील प्रा. लि. डोलवी, तालुका  पेण यांनी विशेष परिश्रम घेतले. 
                
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक