कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

 

रायगड,दि.25(जिमाका) : मा. भारत निवडणूक आयोग तसेच मा. मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी  पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यासाठी 1 नोव्हेंबर, 2023  या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे, या कार्यक्रमाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मा. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघातील मतदारयादया नव्याने तयार करण्याबाबतचा घोषित केलेला कार्यक्रम खालीलप्रमाणे -

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी :-

मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करणे- दि. 30 सप्टेंबर, 2023 (शनिवार). मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी-दि.16 ऑक्टोबर, 2023 (सोमवार). मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिद्धी- दि. 25 ऑक्टोबर, 2023 (बुधवार), नमुना 18 व्दारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख- दि.6 नोव्हेंबर, 2023 (सोमवार). हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदारयाद्यांची छपाई- दि. 20 नोव्हेंबर, 2023  (सोमवार).

प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी- दि. 23 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार), दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- दि. 23 नोव्हेंबर, 2023 (गुरुवार) ते दि. 09 डिसेंबर 2023 (शनिवार), दावे व हरकती निकाली काढण्याची तारीख, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दि. 25 डिसेंबर, 2023 (सोमवार), मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी- दि. 30 डिसेंबर, 2023 (शनिवार).

1 नोव्हेंबर, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयादीत नाव नोंदविणे याकरिता पात्र व्यक्तीने (1 नोव्हेंबर 2023 पूर्वी किमान 3 वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची पदवीधर किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती) फॉर्म नमुना नंबर 18 चा अर्ज व संबंधित कागदपत्रे जोडून ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज संबंधित विधानसभा मतदारसंघामध्ये जमा करावेत.

अहर्ता दिनांकाच्या कमीत कमी 3 वर्ष अगोदर पूर्ण झालेली पदवी/ पदवीत्तर पात्रता, सदर दिनांक हा 30 ऑक्टोंबर 2020 येतो म्हणेजच पात्र मतदाराची पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण 30 ऑक्टोंबर 2020 पूर्वी पूर्ण झालेली असावी. मतदार हा पदवीधर मतदार संघातील रहिवासी असावा. मतदाराची पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण भारतातील कोणत्याही विद्यापिठाची झालेली असेल ती ग्राहय मानली जाईल.पदवी परिक्षेचा निकाल घोषित झालेला दिनांक 3 वर्षांची मुदत ठरवितांना विचारात घेतला जाईल.

मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची पध्दती :-. नमुना 18 मधील अर्ज नाव नोंदणीसाठी दाखल करता येतो.  ज्या मतदारांचे नाव अगोदर पदवीधर मतदार यादीत आहे त्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावा लागतो.  जुन्या पदवीधर मतदार यादीत नाव आहे ही मतदाराची पात्रता नाही. नमुना 18 च्या अर्जासोबत पदवी / पदवीत्तर शिक्षणाची सनद किंवा गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी राजपत्रित अधिकाऱ्यांची साक्षांकित केलेली जोडावी.  मतदारांचे शपथपत्र तसेच विद्यापिठाच्या रजिस्टारचे किंवा कॉलेजच्या प्राचार्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एकगठठा पध्दतीने अर्ज सादर करता येणार नाही. तथापि संस्थेचे प्रमुख पात्र मतदारांचे अर्ज एकत्रित सादर करु शकतील किंवा मतदार एकाच पत्त्यावर राहत असलेल्या त्याच्या कुटूंबातील सदस्याचे अर्ज एकत्रित सादर करु शकतो. पंरतू राजकिय पक्ष किंवा BLA एकगठठा पध्दतीने अर्ज सादर करुन शकणार नाहीत. एकगठठा पध्दतीने अर्ज समक्ष किंवा पोस्टाने पाठवु शकतात. जेव्हा मतदार मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा पदनिर्देशित अधिकारी यांचे समक्ष अर्ज सादर करेल अशा वेळेस त्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेचे मुळ पुरावे ( Original Copies) तपासणीसाठी सादर करावे। लागतील. अशा वेळी संबंधित अधिकारी अर्जदाराच्या अर्जावर शैक्षणिक पुरावे मुळ प्रतीवरुन तपासले व ते बरोबर आढळून आले किंवा बरोबर आढळून आले नाहीत असा शेरा लिहून सही करेल आणि जर तो पदनिर्देशित अधिकारी असेल तर आपला पिन नंबर नमूद करेल.

मतदार नोंदणीसाठी अर्ज कुठे दाखल करावा- मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा पदनिर्देशित ठिकाण.

राजकीय पक्ष, जागरूक नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याकामी सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड डॉ.योगेश म्हसे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक