जलयुक्त शिवार अभियान :113 गावांच्या आराखड्यास तत्वतः मान्यता



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी सन 2017-18 करीता 113 गावांच्या प्राथमिक आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यात  लोकसहभागातून कामे करावयाची कर्जत तालुक्यातील 7 गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील 9 गावे व  तालुकास्तरीय समितीने निवडलेली 41 तसेच ग्राम सामाजिक परीवर्तन अभियानांतर्गत 56 अशा एकुण 113 गावांचा समावेश आहे.

जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात (दि. 13 रोजी) पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके,  आत्मा प्रकल्प संचालक     उपवनसंरक्षक मनिषकुमार,  उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती जैतू तसेच  कृषि विभाग, वन विभाग, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2016-17 मध्ये 38 गावे निवडण्यात आली आहे. या गावात विविध विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांपैकी शिल्लक कामे मार्च, 2018 अखेर पुर्ण करण्यात यावे अशा सुचना  सर्व विभागांना  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या.

 यावेळी सन 2017-18 साठी निवडलेल्या गावांबाबतही आढावा घेण्यात आला. या गावांमध्ये लोकसहभागातील कर्जत तालुक्यातील 7 गावे तसेच रायगड किल्ला परिसरातील 9 गावे व  तालुका स्तरीय समितीने निवडलेली 41 तसेच ग्राम सामाजिक परीवर्तन अभियानांतर्गत 56 अशी एकुण 113 गावांची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या मृद व जल संधारणाच्या कामांच्या आराखडयांना या सभेमध्ये तत्वतः मान्यता देण्यात आली. सन 2017-18 मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रे माहे, डिसेंबर, 2017 अखेर पुर्ण करुन जानेवारी, 2018 मध्ये कामे सुरु करण्याबाबत सर्व यंत्रणांना सुचना देण्यात आल्या.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक