स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प :विभागीय कृषि सहसंचालकांची वरसई येथे भेट



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प अंतर्गत वनराई शेतकरी उत्पादक कंपनी, वरसई येथे विभागीय कृषि सहसंचालक विकास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कंपनीस उत्पादित भाजीपाला संकलन व विक्री करण्यासाठी व्हॅन प्रदान करण्यात आली.
जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्प सन 2013-14 पासून जिल्ह्यामधील अलिबाग, पेण, खालापूर व माणगांव या चार तालुक्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी गटांची निर्मिती करणे व त्यांचे शेतकरी उत्पादक कंपनीत रुपांतरीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आजतागायत 10 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. एम.ए.सी.पी.  अंतर्गत मंजूर व्यवसाय विकास आराखड्यानुसार वनराई शेतकरी उत्पादक कंपनी वरसई ता.पेण या कंपनीच्या संचालकांना विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे विकास पाटील यांचे हस्ते भाजीपाला संकलन व थेट विक्रीसाठी व्हॅन देण्यात आली. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) मंगेश डावरे, प्रकल्प संचालक (आत्मा-2) डी.एस.चव्हाण, तालुका कृषि अधिकारी, पेण,एस.आर.निंबाळकर, तंत्र अधिकारी, ठाणे श्री.ठमके, कृषि पणन तज्ज्ञ तेजस शिंदे रायगड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पेण नचिकेत जगे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक पेण सचिन लोखंडे, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 यावेळी श्री. पाटील यांनी जिल्ह्यात शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र (एफ.सी.एस.सी.) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आढावा तसेच प्रकल्पांतर्गत कृषि सेवा घटकांचा आढावा  घेतला. शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र (एफ.सी.एस.सी.) अंतर्गत मे.आदिती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमीटेड वडखळ, ता.पेण या कंपनीच्या बांधकामाची पाहणी केली. पहाणी दरम्यान उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक