मतदार जागृतीसाठी निवडणूक साक्षरता क्लब :जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात होणार स्थापना




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- निवडणूक विषयक साक्षरता वाढविण्यासाठी, मतदारांमध्ये मतदान विषयक जागृती निर्माण करुन  स्वंयप्रेरणेने होणारे मतदान वाढविण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेविषयी जनमानसात माहिती पोहोचविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी दिली.  
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक साक्षरता जिल्हा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नव मतदारांमध्ये निवडणूक व मतदान या विषयी जागृती व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 30 टक्के शाळा व 30 टक्के महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या-त्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाईल. हे शिक्षक त्यांच्या महाविद्यालयातील नव मतदारांना मतदार नाव नोंदणी, मतदान ओळखपत्र, निवडणूक विषयक विविध अर्ज, त्यांचे प्रयोजन इ. बाबत मार्गदर्शन करतील. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रीया, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन, विविध प्रकारचे अर्ज या विषयी माहिती दिली जाईल. या उपक्रमाद्वारे इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक विषयक शिक्षण व जागृती दिली जाईल. भावी मतदार असणारे वय वर्ष 18 ते 19 मधील मतदारांची नाव नोंदणी ही या उपक्रमात केली जाईल. या शिवाय मतदान केंद्र स्तरावर चुनाव पाठशाला हा  उपक्रम राबविला जाईल. मतदान केंद्र अधिकारी हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर असतील. येथे ही सामान्य नागरीकांना व मतदारांना मतदान निवडणूक आदि प्रक्रीया विषयाची माहिती दिली जाईल. या कार्यात सामाजिक संस्था, स्वंयसेवी कार्यकर्ते आदिंची मदत घेतली जाईल. अशी माहिती या वेळी देण्यात आली.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक