रोह्यातील पशूंच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल - पशुधन विकास अधिकारी डॉ.सांगळे

 

अलिबाग,दि.18(जिमाका):- रोहा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील पशुपालकांनी पशूसंवर्धन विभाग, रोहा यांच्याशी दि.17 जुलै 2022 रोजी संपर्क साधून गावातील पशू मृत पावल्याचे कळविले.

ही माहिती मिळताच रोहा पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले. प्रथमदर्शी घटनास्थळी 03 पशूंचे मृतदेह निदर्शनास आले. मात्र संध्याकाळची वेळ झालेली असल्याने व पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याकारणास्तव या मृत पशूंचे शवविच्छेदन दि.18 जुलै रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पशूंच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच लक्षात येईल, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अक्षय सांगळे यांनी कळविले आहे.

तसेच गावातील पशुपालकांना मार्गदर्शन करुन इतर आजारी पशूंची तात्काळ तपासणी करून त्या पशूंवर आवश्यक उपचारही करण्यात आले.

मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक