महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प : काढणी पश्चात यंत्र सामुगी खरेदी प्रस्ताव मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30:- सन 2017-18 साठी काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन (पी.एच.एम.) अंतर्गत प्रकल्प कार्यक्षेत्रात रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग,पेण,माणगांव,खालापूर या चार तालुक्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे.   यामध्ये डाळ मिल,राईस मिल व काढणी पश्चात कृषिमाल प्रक्रिया यंत्र सामुग्री खरेदीसाठी यंत्र किंमतीच्या कमीत कमी 50 टक्के किंवा  जास्तीत जास्त रुपये 40 हजार (अक्षरी रु.चाळीस हजार मात्र) जी रक्कम असेल तेवढे अनुदान देण्यात येईल.
संबंधित यंत्र सामुगी खरेदी प्रस्ताव प्रकल्प संचालक (आत्मा) रायगड कार्यालय, राऊतवाडी,वेश्वी नर्सरी रायगड-अलिबाग या कार्यालयात सादर करावेत. प्रस्ताव प्रथम सादर करणाऱ्यास  प्रथम प्राधान्य देण्यात येईल.  अधिक माहितीसाठी 02141-226487 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक