महामार्गावरील अवजड वाहतूक बंदचे वेळापत्रक


अलिबाग, जि. रायगड, दि.28- जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 30 ते 31 डिसेंबर व 1 जानेवारी 2018 (शनिवार ते सोमवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार या अवजड वाहतूकीचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. ते याप्रमाणे-
 पर्यटक येण्याच्या वेळा गृहित धरुन हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
शनिवार दि.30 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 यावेळात अवजड वाहतूक बंद.
रविवार दि.31 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 आणि
सोमवार दि. 1जानेवारी 2018 रोजी  दुपारी 12 ते रात्री 10 यावेळात अवजड वाहतुक बंद ठेवण्यात येईल.
 यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.  या वाहतुकीचे संपुर्ण नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वाहतुक पोलिसांनी करावे. वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरणारे महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे.
समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सागरी किनाऱ्यांवर सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत जीवरक्षकांची पथके तैनात ठेवणे. प्रवासी व साहसी खेळाच्या बोटींवर प्रवासी संख्या मर्यादित ठेवणे, त्यावर  प्रवाशांना जीवरक्षक उपकरणे परिधान केल्याशिवाय साहसी खेळांकरीता प्रवेश देऊ नये. किल्ल्यांवर पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रवाशांचे सामान तपासणी करुनच त्यांना किल्ल्यांवर प्रवेश देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केल्या होत्या. या सुचनांच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलीस व अन्य विभाग नियोजन करीत आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक