बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा पनवेल येथे 22 रोजी भव्य आयोजन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13-  जिल्हा उद्योग केंद्र रायगड-अलिबाग मार्फत शनिवार दि.22 जून रोजी पिल्लई कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंग नवीन पनवेल येथे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्याची  माहिती अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी आज येथे दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रोजगार मेळाव्या संदर्भात आयोजित कार्यबल समितीच्या बैठकीत  ते बोलत होते.



             यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी माहिती देण्यात आली  की,  या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून 10 वी, 12 वी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ते सर्व शाखांच्या पदवी, पदविकाधारक उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.   उमेदवारांनी दि.12 ते 20 जून 2019 दरम्यान www.balasahebthackerayrojgarmelava.com या संकेतस्थळावर, मोबाईल ॲपवर किंवा 74001 55509/022-25744205 या क्रमांकावर नोंदणी करावी.  नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक त्वरित मिळेल.   या मेळाव्या संदर्भात अधिकाधिक जनजागृती करुन गरजुंपर्यंत माहिती पोहोचवावी असे निर्देश अपर जिल्हाधिकारी श्री.शितोळे यांनी दिली.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक