उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील बालकांना रविवारी (दि.16)लसीकरण



अलिबाग, जि.रायगड, दि.13 (जिमाका) – जिल्ह्यातील पनवेल, उरण , कर्जत आणि खालापूर या चार तालुक्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दि.16 रोजी पल्स पोलिओचा जादा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली.या संदर्भात बुधवारी (दि.12 ) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन पूर्वतयारीचा आढाव घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई आदि उपस्थित होते.
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या चारही तालुक्यातील मिळून शहरी व ग्रामीण भागात 99 हजार 484 बालकांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शहरी भागात 67 तर ग्रामीण भागात 832 अशा एकूण 899 बुथवर पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 8 ते सायं. 5 या वेळात या केंद्रावर बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येईल. या लसीकरणासाठी 2152 आराग्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
तरी या लसीकरण मोहिमेत पनवेल, उरण, कर्जत, खालापूर येथील पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकास पोलिओचा डोस पाजावा असे आवाहन अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक