जिल्हा नियोजन समिती बैठक : 211 कोटींच्या कामांना मंजूरी : जिल्हा विकासाचा निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित- पालकमंत्री चव्हाण



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 : जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या आढावा बैठकीत वार्षिक आरखड्यातील 211 कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजूरी देण्यात आली.  जिल्हा नियोजन समितीचा निधी यंत्रणाकडून वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी दिले. 
            आज जिल्हा नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीस पालकमंत्री चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.बाळराम पाटील, विधानसभा सदस्य सर्वश्री  आमदार सुरेश लाड, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, आ.मनोहर भोईर तसेच प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
            बैठकीच्या प्रांरभी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आ.जयंत पाटील यांचे अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.  तसेच जिल्हा नियोजनचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा सातत्याने अग्रेसर राहिला असून याबद्दल जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे ही अभिनंदन करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सन 2019-20 करिता शाळा, अंगणवाडी दुरुस्तीची कामे मंजूर करण्याबाबत सूचना मांडली.  तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनास अन्य अशासकीय, समाजसेवी संस्थांना त्यांच्या कार्यक्रमासाठी योग्य दराने प्रतितास भाडे आकारुन वापर करण्यास परवानगी देण्याबाबतही ठराव करण्यात आला.  ज्या प्रमाणे विजेचे दर वाढतील त्याप्रमाणे भाडेवाढ करण्याचे अधिकारही जिल्हा नियोजन समितीस देण्याचे ठरविण्यात आले. 
            यावेळी जिल्हा नियेाजन समितीवर नुकतेच नियुक्त झालेले  अशासकीय निमंत्रित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात देवेंद्र साटम, सतिश धारप, विष्णू पाटील, ॲङमहेश मोहिते, महेंद्र दळवी, जयवंत दळवी, कृष्णा पोकल, अरुण भगत, जयदीश गायकवाड, आत्माराम पाटील, राजू साबळे, महादेव पाटील यांचा समावेश होता.  बैठकीचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले. 
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक