श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनींकरीता प्रवेशासाठी चाचणी




अलिबाग, जि. रायगडदि.10(जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीकरीता प्रवेशासाठी चाचण्याचे आयोजन करण्यात येणार असून त्याचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            सरळ प्रवेश प्रकीया :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देवून प्रवेश निश्चित केला जाईल.
1) आर्चरी 24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता. क्रीडा प्रबोधिनी अमरावती.             2) हॅण्डबॉल 24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता क्रीडा प्रबोधिनी नागपूर. 3) बॉक्सिंग 24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता क्रीडा प्रबोधिनी अकोला. 4) अथलेटिक्स, जलतरण, शुटींग, सायकलिंग, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स, कुस्ती, बॅटमिंटन  24 ते 25 जून 2019 उपस्थिती 24 जून रोजी सकाळी 10.00 वाजता  श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे-45.
खेळनिहाय कौशल्य चाचणी :- क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षा आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रेवश निश्चित केले जातील.
1) आर्चरी 25 ते 26 जून 2019 उपस्थिती 25 जून रोजी सकाळी 10.00 वाजता. क्रीडा प्रबोधिनी अमरावती.              2) हॅण्डबॉल 25 ते 26 जून 2019 उपस्थिती 25 जून रोजी सकाळी 10.00 वाजता क्रीडा प्रबोधिनी नागपूर. 3) बॉक्सिंग 25 ते 26 जून 2019 उपस्थिती 25 जून रोजी सकाळी 10.00 वाजता क्रीडा प्रबोधिनी अकोला. 4) अथलेटिक्स, जलतरण, शुटींग, सायकलिंग, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स, कुस्ती, बॅटमिंटन  25 ते 26 जून 2019 उपस्थिती 25 जून रोजी सकाळी 10.00 वाजता  श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे-45.
चाचणीसाठी सर्वसाधारण सूचना :- सदर चाचण्यांकरीता खेळाडूंची कोणतीही निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार नाही. सदर चाचण्यांकरीता येणाऱ्या खेळाडूंनी चाचणी जाण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे स्वत:च्या नावाची व खेळाची नोंदणी करणे बंधनकारक राहील. सदर चाचण्यांकरीता येणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्ज व संबंधित स्पर्धेचे प्राविण्य/सहभाग प्रमाणपत्र चाचणीस्थळी उपस्थितीच्या दिनांकास सादर करावे. सदर मान्यतेत निवड प्रक्रीया राबवितांना सदर प्रवेश प्रक्रीयेन्वये जर इच्छुकांची संख्या 50 % पेक्षा जास्त असेल तर अशाप्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा व उर्वरित जागेंवर कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश देण्यात येईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक