समुद्रात पोहण्यास, मासेमारीस प्रतिबंध



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13-  वायु चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शनिवार दि.15 जून पर्यंत वादळी वारे वाहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे, अशी पूर्वसूचना इंडियन कोस्ट गार्ड, मुरुड यांचेकडून जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे.  त्या अनुषंगाने मच्छिमार, पर्यटक व नागरिकांना समुद्रात पोहण्यास, मासेमारी करण्यासाठी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.  त्यासाठी बिचेसवर आवश्यक पोलिस बंदोबस्त लावावा.  जीवरक्षक, बचाव साहित्य बीचेसवर  उपलब्ध करावे.  तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322/9763646326 या क्रमांकांवर संपर्क साधावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे यांनी जारी केल्या आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक