मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज(दि.15) जिल्हा नियोजन भवनाचे ई-पद्धतीने उद्घाटन


अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन आज दिनांक 15 जून रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.  या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे. 
            या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड ना. रविंद्र चव्हाण यांची  विशेष उपस्थिती राहणार आहे.  तर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, आ.निरंजन डावखरे, आ.बाळराम पाटील, आ.अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य सर्वश्री  आमदार सुरेश लाड, आ.प्रशांत ठाकूर, आ.भरतशेठ गोगावले, आ.धैर्यशील पाटील, आ.सुभाष ऊर्फ पंडितशेठ पाटील, आ.मनोहर भोईर, आ.अवधूत तटकरे, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य सर्व यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक