जागतिक रक्तदान दिन सर्वांसाठी सुरक्षित रक्त




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-   कार्ल लँडस्टेनर(Karl Landsteiner) ए,बी,ओ 'रक्तगटाचा जनक 'यांच्या जयंतीदिनी 14 जून  हा ‘जागतिक
 जागतिक रक्तदान दिन
सर्वांसाठी सुरक्षित रक्त
कार्ल लँडस्टेनर(Karl Landsteiner) ए,बी,ओ 'रक्तगटाचा जनक 'यांच्या जयंतीदिनी 14 जून  हा ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सहानुभूती व सामाजिक बांधिलकी व स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा ‘जागतिक रक्तदाता दिवस’ साजरा करतात. या वर्षी या दिनानिमित्त शासनाचे घोषवाक्य ‘Safe  Blood For All.’ अर्थात ‘सर्वांसाठी सुरक्षित रक्त’ असे आहे.
ऑस्ट्रेलियातील डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला.     सन २००४ मध्ये जागतिक आरोग्य संघटना,रेड क्रॉस, रेड क्रेसेन्ट सोसायटीचे आतंरराष्ट्रीय फेडरेशन यांनी १४जून रोजी सर्व प्रथम रक्तदाता दिवस साजरा केला.
जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटी (Red Crescent Societies)आंतरराष्ट्रीय फेडरेशन आँफ ब्लड डोनर आँर्गनायझेशन्स (IFBDO)आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन (ISBT) यासारख्या हेल्थ केअर एजन्सिज संयुक्त पणे आंतरराष्ट्रीय संघटना आयोजित करतात. जागतिक स्तरावर लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम करतात. सन २००४च्या सुरुवातीला स्वस्थ व्यक्तिने स्वैच्छिक आणि न चुकता दिलेले रक्तदान हे समाजात आवश्यक लोकांची जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू केला होता.
      जागतिक रक्तदान दिवस (रक्तदाता)अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेने १९५२ मधील १९२ सदस्यासह २००५मध्ये ५८व्या जागतिक आरोग्य परिषदेत स्थापन केला आहे.
डॉ.कार्ल लँडस्टेनर यांचे कार्य:--
   १)डॉ.कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तातील प्रतिजन(Antigens)व प्रतिद्रव्ये(Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे घटक तयार केले.
 २)रक्तगटाचे A,B ,AB  आणि O हे मुख्य प्रकार आहेत.
३) इ.स.१९००साली कार्ल लँडस्टेनर( karl landsteiner)यांनी A B O (ए,बी, ओ )लावला.तर चौथा "AB"या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली(Decastellor And Sturli) यांनी१९०२मध्ये लावला. 
४)१९०९साली पोलिओ व्हायरसचा शोध लावला.
५)१९४०साली कार्ल लँडस्टेनर व ए.एस. व्हिनेर(Weiner)यांनी आर एच फँक्टर चा शोध.
त्यांच्या या अमूल्य संशोधनाबद्द्ल त्यांना सन १९३० साली
  नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
 रक्तदाताः रुग्णांसाठी देवदूत:--      आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा एक घटक म्हणून ऋण फेडण्याची संधी रक्तदानाने आपल्याला मिळवून देते. "रक्तदाता" हा रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या द्दष्टीने रुग्ण व डॉक्टर यामधील महत्वाचा एक दुवा आहे. यासाठी "रक्तदाता "हा रुग्णासाठी एक देवदूतच ठरतो.
एखाद्या अपघात ,शस्त्रक्रिया किंवा प्रसुती वेळी अति रक्तस्त्राव अशावेळी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी नेहमीच रक्ताची गरज असते.अशावेळी रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसल्यास रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होते. अशावेळी योग्य रक्ताचा पुरवठा न झाल्यास रुग्णाचे प्राण जाऊ शकतो. अशावेळी रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबीर, आपल्या जवळच्या शासन मान्यता रक्तपेढीत जावून  सामाजिक बांधिलकी म्हणून स्वेच्छेने रक्तदान करणे आवश्यक आहे.रक्तदान हे सुरक्षित व वेदनारहित व आनंददायी असल्याने जास्तीत जास्त लोकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावे.

   मानवी रक्ता संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी :--
१)मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही.
२)रक्त हे कुठल्याही प्रयोग शाळेत अथवा कारखान्यात तयार होत नाही
३)रक्त हे फार काळ टिकवून वा साठवता
  येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते.
४)थँलसिमिया, सिकलसेल, अँनेमिया, कर्करोग या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते.
५)अपघात, प्रसुती, शस्त्रक्रिया इ.साठी रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी नेहमीच रक्ताची आवश्यकता असते.
६)कुणाला कधी व कुठे रक्ताची गरज पडेल हे आपण सांगू शकत नाही.
७)आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिट मधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात.(तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी(प्लाझमा),रक्तबिंबीका(प्लेटलेट्स)इ.अशाप्रकारे आपल्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण वाचवू शकता.
८)रक्तदान केल्यानंतर चोवीस तास ते सात दिवसाच्या आत रक्ताची नैसर्गिक रित्या झिज भरून निघते.
९)दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकता.
१०)वैद्यकीय तपासणी व टेस्ट करूनच रक्तदान करता येते.
  रक्तदानाचे फायदे:--
१)रक्ताची तपासणी होते.(एचआयव्ही, कावीळ( ब,व क प्रकारची )गुप्तरोग, मलेरिया इ.
२)बोनमँरो मध्ये नवीन रक्त करण्याची कार्यक्षमता वाढते.
 
३)नविन रक्त तयार होण्यास चालना मिळते. रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून नव चेतना निर्माण होते.
४)नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण(कोलेस्ट्रॉल)आवश्यकतेपेक्षा वाढत नाही. त्यामुळे ह्रदय, यकृतयासारखे अवयव स्वस्थ राहतात.
५)रक्तगट व हिमोग्लोबीन च्या प्रमाणाची  माहिती मिळते.
६)वजन, तापमान, रक्तदाब ,नाडी इ. परिक्षण होते.
रक्तदान कोण करु शकत नाही:--
१)मागील तीन दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले असल्यास.
२)मागील तीन महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
३)मागील एक वर्षात विषमज्वर ,कावीळ किंवा श्वान दंश होऊन रेबीज ची लस घेतली असल्यास.
४)सहा महिन्यापूर्वी मोठी शत्रक्रिया झाली असल्यास.
५)गर्भवती महिला, महिलेला एक वर्षाखालील मूल असल्यास तसेच तिचा सहा महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
मी रक्तदाता..... मी जीवनदाता:--
१४जून "जागतिक रक्तदाता दिना"च्या निमित्ताने एक संकल्प केला तर......
आज कुठे तरी माझ्या नातेवाईकांना, मित्रांना, एखाद्या अनोळखी व्यक्तीस,यांना माझ्या रक्ताची गरज आहे. माणसाला मानवी आयुष्य एकदाच मिळते, मागच्या जन्मी आपण काय होतो हे आपल्याला माहित नाही पुढच्या जन्मी आपण काय असू आपण सांगू शकत नाही तर या जन्माला आपण माणूस म्हणून आलो आहे तर माणुसकीच्या द्दष्टीने ,सामाजिक बांधिलकी , देशाचा नागरिक म्हणून रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी" रक्तदाता"या नात्याने रक्तदान करावे. हे आजच्या "जागतिक रक्तदाता दिवस " या निमित्ताने आवाहन.
रक्तदानविषयी जनजागृती :---
    रक्तदानाविषयी समाजात जनजागृती व्हावी यासाठी केंद्र सरकार व नँको, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था, (मुंबई),राज्य रक्तसंक्रमण परिषद,यांचे मार्गदर्शनाखाली हाँस्पिटल, एन.जी.ओ. धर्मदाय संस्था इ.महाविद्यालयात, सामाजिक संस्था, राजकीय, विविध प्रकारच्या संस्था इ.मार्फत रक्तदानाविषयी जनजागृती, प्रभातफेरी, विविध वर्तमानपत्र, ईलेट्राँनिक मिडिया इ.मार्फत रक्तदानाविषयी जनजागृती केली जाते.
"Safe Blood For  All." सर्वासाठी सुरक्षित रक्त."

."रक्तदान कर के देखो,अच्छा लगता है।"
-         हेमकांत सोनार, रक्तपेढी तंत्रज्ञ, जिल्हा रुग्णालय अलिबाग.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक